इंदोरेवाडीजवळ खंडोबा मंदिराचे काम अंतिम टप्प्यात

अवसरी- अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील इंदोरेवाडी – वारसुळा- भोरवाडीत कुलदैवत खंडोबाच्या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. खंडोबा मंदिरास सुमारे वीस लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात येत आहे. मंदिराचा आकर्षक घुमट आणि घुमटाच्या कलाकुसर भाविकांचे लक्ष वेधून घेत असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य संतोष भोर यांनी सांगितली. इंदोरेवाडी – वारसुळा आणि भोरवाडीच्याजवळ असणाऱ्या डोंगरावर श्री खंडोबाचे पुरातन मंदिर होते. त्यामुळे इंदोरेवाडी – भोरवाडी, वारसुळा आणि अवसरी परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणीतून सुमारे वीस लाख रुपये खर्च करून खंडोबाच्या मंदिराचे नूतनीकरण करून बांधकाम पूर्ण केले आहे. खंडोबाच्या मूर्तीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मंदिर नूतनीकरण करताना सभामंडप प्रशस्त करण्यात आले आहे. सभा मंडपास आकर्षक लोखंडी ग्रील बसवण्यात आल्या आहेत. मंदिराचा घुमट आकर्षक बनवण्यात आला आहे. या मंदिरास रंगरंगोटीसारखी किरकोळ कामे बाकी आहेत. काही दिवसांत मंदिराचा जिर्णोद्धार होणार असल्याची माहिती वारसुळा येथील ग्रामस्थ पंढरीनाथ शिंदे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)