इंदोरी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

इंदोरी – इंदोरी येथे ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग फंड व पुणे जिल्हा परिषद फंडातून झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण मावळ तालुका सभापती गुलाबराव म्हाळसकर, जिल्हा परिषद्‌ सदस्य नितीन मराठे, इंदोरी गावचे उपसरपंच अंकुश ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये ग्रामपंचायत फंडातून इंदोरी दलित सुधारीत वस्ती येथे भूमिगत गटर, पानसरे वस्ती येथे पिण्याची पाईप लाइन, इंद्रायणीनगर येथे भूमिगत गटर, कुंडमळा येथे पिण्याची पाईपलाइन, तसेच जिल्हा परिषद फंडातून आदिवासी रहिवासी वस्ती येथे कॉंक्रीट रस्ते असे एकूण अंदाजे 30 लाख रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी इंदोरी गावातील सर्वपक्षीय पदधिकाऱ्यांचे कौतुक केले.

-Ads-

इंदोरीगाव हे विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. या गावामध्ये विकास कामांसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र येत असतात. ही बाब कौतकास्पद आहे. येथून पुढे देखील मी जिल्हा परिषद फंडाच्या माध्यमातून इंदोरी येथे विकास काम करेल, असे अश्‍वासन यावेळी देण्यात आले. या वेळी माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, माजी सरपंच संदीप काशिद, दामोदर शिंदे, जगन्नाथ शेवकर, अरविंद शेवकर, बबन ढोरे, दिलीप ढोरे, प्रशांत भागवत, रमेश घोजगे, आशिष ढोरे, नितीन ढोरे, बाळकृष्ण पानसरे, इंदोरी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)