इंदोरी  – इंदोरी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्याजवळून गेल इंडिया गॅस लाईन व जुन्या रस्त्याजवळून एचपी पेट्रोल लाईन गेल्याने त्याचा पाठपुरावा करून ग्रामपंचायतीने त्यांची रीतसर परवानगी घेऊन कामास सुरवात केली आहे. इंदोरी शहरातील वसाहतीमधील नागरिकांची संख्या वाढू लागल्याने दररोज होणाऱ्या वर्दळीचे प्रमाण वाढत चालले आहे. यासाठी नागरिकांना वाडी-वस्त्यांमधून दळणवळण करण्यासाठी सोयीस्कर रस्ते उपलब्ध व्हावे यासाठी हा आमचा प्रयत्न आहे, असे उपसरपंच अंकुश ढोरे यांनी सांगितले.

या वेळी माजी आदर्श सरपंच संदीप काशिद, भारतीय जनता पार्टी मावळ तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, भाजपचे इंदोरी शहराध्यक्ष जगन्नाथ शेवकर, माजी सभापती विठ्ठल शिंदे, राष्ट्रवादीचे इंदोरी शहर अध्यक्ष दिलीप ढोरे, ज्येष्ठ नेते अरविंद शेवकर, बबन ढोरे, जगन्नाथ हिंगे, माजी उपसरपंच बाळा घोजगे, सरपंच कीर्ती पडवळ, उपसरपंच अंकुश ढोरे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत भागवत, बाळासाहेब पानसरे, विक्रम पवार, नितीन ढोरे, सोनल सूर्यवंशी, लिला शेवकर, गीतांजली हिंगे, कांचन चव्हाण, मंगल ढोरे, कविता चव्हाण आणि इंदोरी ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)