- उपसरपंच अंकुश ढोरे यांचा पुढाकार
इंदोरी (वार्ताहर) – इंदोरी ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नाच्या तीन टक्के “अपंग कल्याण’ निधीतून उपसरपंच अंकुश ढोरे यांच्या प्रयत्नाने 10 दिव्यांगांना एकूण 33 हजार 400 रुपये धनादेशाचे वाटप नुकतेच करण्यात आले.
गेल्या वर्षी 20 दिव्यांगांना मदत निधी देण्यात आला होता. गावातील दिव्यागांनी कधीही स्वतःला दिव्यांग न समजता अन्य नागरिकांप्रमाणे जीवन जगण्यास तयार व्हावे म्हणून त्यांना हा निधी उपजीविकेसाठी देण्यात आला आहे. उपजीविकेसाठी काही व्यवसाय सुरू करून दिव्यागांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, असे सरपंच कीर्ती पडवळ यांनी यावेळी सांगितले. उपसरपंच अंकुश ढोरे यांनी स्त्री जन्माचे स्वागत करत गावामध्ये जन्मास आलेल्या मुलीस प्रत्येकी दोन हजार रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतीतर्फे देण्यास सुरवात केली.
सरपंच कीर्ती पडवळ, ग्रामसेवक डोळस भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य दिनेश चव्हाण, विक्रम पवार, सोनाली सुर्यवंशी, कांचन चव्हाण, प्राजक्ता आगळे, लीलावती शेवकर, मंगला ढोरे, गीता हिंगे व ग्रामस्थ उपस्थित होते. निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून दिव्यांगांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले. या सामाजिक कार्याचे गावातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा