इंदोरी येथे गावकऱ्यांकडून स्वच्छता अभियान 

प्लॅस्टिक बंदीची केली जनजागृती

इंदोरी – इंदोरी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून जनजागृती प्रारंभ करण्यात आला. या अभियानाची सुरवात ग्रामपंचायत समोरील परिसर, गावातील हनुमान मंदिर, भाजी मंडई परिसर स्वच्छ केला. स्वच्छता अभियान गावामध्ये तीन दिवस राबविण्यात येणार आहे.

दररोज दोन विभागामध्ये स्वच्छतेविषयी माहिती देऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या वेळी गावातील मुख्य बाजारपेठेमध्ये व नागरिकांच्या घरी जाऊन प्लॅस्टिक बंदीची पत्रके वाटण्यात आली. त्याविषयी घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन करण्यात आले. आपल्याला जर निसर्गातून होणाऱ्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर आपण आपला परिसर स्वच्छ ठेवायला हवा, असे आवाहन उपसरपंच अंकुश ढोरे यांनी ग्रामस्थांना केले आहे.

तसेच नागरिकांना प्लास्टिक बंदी व स्वच्छतेविषयी माहिती देऊन आपल्याला होणाऱ्या आजारांपासून कसे दूर राहता येईल, त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सरपंच कीर्ती पडवळ, उपसरपंच अंकुश ढोरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पानसरे, कांचन चव्हाण, लीलाताई शेवकर, कविता चव्हाण, मंगला ढोरे, संगीता राउत, सोनल सूर्यवंशी, गीता हिंगे, मनीषा शेवकर, प्राजक्‍ता आगळे, नितीन ढोरे, ग्रामपंचायत कर्मचारी विजय हिंगे, दाउद मुलांनी, योगेश सावंत व नागरीक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)