इंदोरी येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूलचे स्नेह संमेलन 

इंदोरी, (वार्ताहर) – इंदोरी येथील चैतन्य इंटरनेशनल स्कूलचे स्नेह संमेलनानिमित्त नवरस सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गणेश वंदना, शिवराज्याभिषेक सोहळा, लहान मुलांचे कलाविष्कार, देशभक्‍तीपर गाणी, लावणी, प्रसिद्ध घुमर हे कार्यक्रम दाखवण्यात आले. कार्यक्रमासाठी पद्मश्री डॉ. नौशाद पदमसी प्रमुख पाहुणे, तर तोलानी ग्रुपच्या डॉ. सुजाता तोलानी नाईक उपस्थित होत्या. सरस्वती पूजन व विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप यावेळी करण्यात आले. मुख्याध्यापिका हेमलता खेडकर यांनी अहवाल वाचन केले.

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष भगवान ना. शेवकर, उपाध्यक्ष बी. के. सक्‍सेना, सचिव राधिका भ. शेवकर, डायरेक्‍टर आर. कुमार, त्यागराज शेवकर, वैशाली माली, तसेच पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)