इंदोरी येथील गणेश मंडळाना मुस्लीम समाजाकडून प्रसाद वाटप

इंदोरी : येथील गणेश मंडळाना मुस्लिम समाजाकडून प्रसाद वाटप करण्यात आले.

इंदोरी, (वार्ताहर) – इंदोरी परिसरातील सर्व गणेश मंडळाना मुस्लिम समाजाकडून प्रसाद वाटप करण्यात आले. या वेळी असा उपक्रम राबवून इंदोरी परिसरात हिंदु-मुस्लिम ऐक्‍यचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

इंदोरी येथील श्री हनुमान मंदिर गणेश मंडळ, ग्रामदैवत श्री कडजाई माता गणेश मंडळ, शिवशक्ती गणेश मंडळ, इंद्रायणी गणेश मंडळ आदी गणेश मंडळाना इंदोरी परिसरातील मुस्लिम समाजाकडून प्रसाद वाटप करण्यात आला. गणेश मंडळमध्ये स्वतः जाऊन गणेश आरतीमध्ये सहभाग घेऊन एक समाजापुढे आदर्श ठेवण्यासारखा उपक्रम इंदोरी परिसरात होत आहे. यामध्ये हामिद भाई मुलाणी, नुरभाई मुलाणी, चांदभाई मुलाणी इंदोरी परिसरातील मुस्लीम समाज यांनी सहभाग घेतला आहे.

या वेळी श्री हनुमान मंदिर गणेश मंडळाचे कार्याध्यक्ष दशरथ ढोरे, माजी सभापती विठ्ठल शिंदे, माजी उपसरपंच दिलीप ढोरे, प्रशांत ढोरे, जीवन काशिद, अंकुश ढोरे, अरुण इंगवले, महेश सावंत आदीने उपस्थित आभार मानले. आंबी एमआईडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या हस्ते “श्री’ची आरती झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)