इंदोरी परिसरात काकडा आरतीची सांगता

इंदोरी – इंदोरी येथील इंद्रायणी नगर येथील श्रीराम मंदिर, तसेच सावता माळी मंदिर, इंदोरी मुख्य बाजार पेठेतील हनुमान मंदिर येथे एक महिन्यांपासून होत असलेल्या काकड आरती समारंभाची सांगता शनिवारी (दि.24) विविध धार्मिक उपक्रमांनी झाली.

इंदोरी परिसरात पहाटे चार वाजल्यापासून नित्य नियमाने कोजागिरी पौर्णिमेपासून दररोज पहाटे महापूजा, काकडा आरती, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता अतिशय भक्‍तीभावाने करण्यात आली. श्रीराम मंदिर येथे ह. भ. प. रवींद्र महाराज ढोरे (इंदोरी) यांचे काल्याचे कीर्तन झाले.

-Ads-

समाजाला आपण काय देतो याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आयुष्य जगत असताना विचारांच्या विशिष्ट पातळीवर समदृष्टी ठेवणे गरजेचे आहे. चराचरांत देव शोधता आला पाहिजे. आपला कर्म-धर्म सोडू नये. एखादा वाईट वागत असला, तरी त्याच्याशी चांगले वागणे म्हणजे परमार्थ होय, असे प्रतिपादन ह. भ. प. रवींद्र महाराज ढोरे यांनी इंदोरी येथे केले. इंदोरी येथील समस्थ ग्रामस्थ श्रीराम भजनी मंडळ व महिला भजनी मंडळाच्या वतीने आयोजित कीर्तनात निरुपण करताना ते बोलत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)