“इंदू सरकार’वरून मधुर भांडारकरांना पोलीस संरक्षण

आगामी “इंदू सरकार’ या चित्रपटाला कॉग्रेसकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बालिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना राज्य सरकारकडून पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे. “इंदू सरकार’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी भांडारकर हे दोन दिवसांपूर्वी नागपूर दौऱ्यावर असताना त्याने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

मात्र, यावेळी कॉग्रेस सामर्थकांनी भांडारकर यांना आपल्या हॉटेलमधूनही बाहेर येऊ दिले नव्हते. त्याआधीही पुण्यातही असाच प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने भांडारकरला ही सुरक्षा पुरवली आहे.
या घटनेनंतर भांडारकरने ट्‌विट करून तुमचा या गुंडगिरीला पाठींबा आहे का? मला माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? असा प्रश्न कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केला होता.

दरम्यान, या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्याबाबत कोणतीही चुकीची माहिती आम्ही मांडलेली नाही. तसे करायचे असतेच तर मी शंभर टक्के माहितीपटच बनवला असता, चित्रपट बनवला नसता. असे स्पष्टीकरण मधुर भांडारकर यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)