इंदूरमध्ये भररस्त्यावर मॉडेलचा विनयभंग

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल
इंदूर – मध्य प्रदेशमधील इंदूर येथे भररस्त्यात दुचाकीवरून जात असलेल्या एका मॉडेलचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला. या प्रकाराबाबत पिडीत युवतीने ट्विट केल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर पोलिसांनीच पीडित तरुणीशी संपर्क साधून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पिडीत तरुणीनी ट्विट केले की, मी स्कूटरवरून जाताना दोघा दुचाकीस्वार तरुणांनी आपला स्कर्ट खेचला आणि अश्‍लाघ्य भाषेत छेडछाड केली. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना माझा तोल गेल्याने मी स्कूटरवरून पडले आणि मांड्यांना दुखापत झाली, असेही तिने फोटो पोस्ट करुन लिहिले होते.

-Ads-

इंदूरमधील गजबजलेल्या रस्त्यावर आपण दुखापतग्रस्त होऊन पडलेली असतानाही कोणी टवाळखोरांना पकडण्यासाठी माझ्या मदतीला आले नाही, अशी खंतही तिने व्यक्त केली.

माझ्या स्कर्टमुळे माझ्याशी छेडछाड झाली, हा आरोप किती मूर्खपणाचा आहे. मी पडल्यावर माझ्या मदतीला आलेले एक काकाही मला म्हणतात की तू स्कर्ट घातल्यामुळे हा प्रकार झाला. मला इतके अगतिक कधीच वाटले नाही, असेही ती म्हणाली.

हे ट्‌वीट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रिट्‌वीट केले. पीडित मॉडेलला न्याय देण्याचे आदेश चौहान यांनी डीआयजी आणि कलेक्‍टरला दिले आहेत. पोलीस घटनास्थळाचे सीसीटीव्ही फूटेज तपासून आरोपींचा शोध घेत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)