इंदूरमध्ये अवघ्या ४ महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

इंदूर : कठुआ, उन्नाव आणि सुरतमधील बलात्काराच्या घटनांनी देश हादरला असतानाच इंदूरमधील ऐतिहासिक शिव विलास पॅलेसच्या तळघरात एका ४ महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीस घटनास्थळी आले तेव्हा त्यांना मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. हा काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार पाहून पोलीसही हादरले. मृतदेह कपड्यात लपेटून आणताना पोलिसांना अश्रू आवरले नाहीत. हे अमानुष कृत्य करणारा पीडितेचा नातेवाईकच असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात या बालिकेवर बलात्कार झाल्याचे व डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)