इंदापूर मोसंबीची पहिल्यांदाच लागवड

निरवांगीतील गुरव पिता- पुत्राची नाविन्यता : पारंपारिक पिकांना फाटा

निमसाखर- निरवांगी (ता. इंदापूर) येथील गुरव पिता – पुत्रांनी पारंपारिक शेतीला फाटा देत सुमारे दीड एकरांवर गावातील पहिलीच मोसंबीची लागवड केली आहे. सध्या निरवांगी परिसरात डाळिंब, द्राक्षांसह अन्य प्रकारचे फळबागा आहेत. या फळबागांना मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याने मोसंबीकडे वळल्याचे बागातदार सुहास बबन गुरव यांनी सांगितले.
निरवांगी परिसरांमध्ये गेली पंधरा वर्षांपूर्वी ज्वारी, बाजरी, मकासह अन्य नगदी पिके घेतली जात होती. याचबरोबर काही विशिष्ट भागात तरकारी पिके घेण्याकडे कल पहावयास मिळत होता. नंतरच्या काळामध्ये शेतकरी द्राक्षे, डाळिंब, पेरू, शेवगासह अन्य उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी बागा लावण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्यापैकी उत्पन्नही मिळू लागले. मात्र, मध्यंतरीच्या काळामध्ये फळबागांमधील उत्पन्न वाढले. त्याप्रमाणात रासायनिक औषधांवरही खर्चही वाढला. परंतु त्या मानाने उत्पादित मालाला योग्य भाव शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे शेतकरी आर्थिक खाईत लोटला गेला. यातून उभारी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नाविन्यता जोपासली.
डाळींब व द्राक्ष बागांवर वाढलेला खर्च आणि नफा पदरी पडत नसल्याने सुहास गुरव व गणेश गुरव यांचे वडील बबन शंकर गुरव यांच्या विचारातून मोसंबीची संकल्पना पुढे आली.

  • काही वर्षापूर्वी मोसंबी फळबागेच्या अनुभवावर पुन्हा फळबाग लावण्याचा व कमी खर्चात लागवड करण्याचा विचार नक्‍की झाला. जालनावरुन तीनशे रोपे खरेदी केली. ही सर्व रोपे पोहोच मिळवत 6 हजार रुपयांपर्यत खर्च होता. आत्तापर्यंत दीड एकराच्या फळबागेसाठी 35 ते 40 हजारांपर्यंत खर्च झाला आहे. रोपांची लागवड 15 बाय 15 या अंतरावर केली आहे. ही रोपे 16 महिन्यांची झाली आहे. लागवडीपासून सर्वसाधारण चार वर्षांनी फळधारणा होते. सध्या मोसंबीला 35 ते 40 रुपयांपर्यंत बाजारपेठेत दर आहे. हा भाव उन्हाळ्यात वाढतो.
    -सुहास गुरव, मोसंबी उत्पादक, शेतकरी, निरवांगी.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)