इंदापूर महाविद्यालयात विविध दाखल्यांचे वाटप

रेडा- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले इंदापूर महाविद्यालयात प्रदान करण्यात आले. इंदापूर तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार शुभांगी अभंगराव यांच्या हस्ते तसेच इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या उपस्थित या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्‍यक असणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, डोमासाईल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर दाखल्यांसाठी महाविद्यालयामध्ये तहसील कार्यालयाच्या सहकाऱ्याने सुविधा करण्यात आली होती. 55 विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे यावेळी वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. शिवाजी वीर , विनायक कुलकर्णी, तेजस मखरे, विक्रम नलवडे, राहुल कुंभार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब पराडे तर प्रा. बाळासाहेब काळे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)