इंदापूर महाविद्यालयात पुरातन मूर्त्यांचा संग्रह

इतिहास विभाग राबवतोय संशोधनासाठी संधी हा उपक्रम

इंदापूर- दुष्काळजन्य परिस्थितीचा इतिहास संशोधनासाठी संधी म्हणून वापर करण्याचा हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून इंदापूर महाविद्यालय राबवत आहे. त्यानिमित्ताने पुरातन महत्त्व असणाऱ्या मूर्त्यांचा संग्रह महाविद्यालयाच्या इतिहास विभागाकडे तयार झाला असून त्यांचा इतिहास नव्याने मांडण्याची संधी महाविद्यालयीन युवकांना मिळत आहे.

याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले की, तीन-चार वर्षापूर्वी पडलेल्या भीषण दुष्काळामुळे पळसदेव येथील उजनी पाणलोट क्षेत्रात बुडून गेलेले पळसनाथाचे मंदिर पूर्णतः उघडे पडले होते. त्या मंदिराला भेटी देणाऱ्यांमध्ये महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक होतो. मंदिराचे नक्षीकाम, धार्मिकतेची पवित्रा व आपल्या पूर्वजांची कलेतील श्रीमंती या दोन्ही बाबी मनाला स्पर्शून गेल्या. दरम्यान, मूर्ती विरगळींचा अभ्यास केला तर इतिहासातील नवेपणा प्रकाशात येईल, असे आम्हा सर्वांना जाणवले. त्यावेळेपासून तालुक्‍यात उत्खननात सापडलेल्या व नदी किनाऱ्यावर असलेल्या ऐतिहासिक मूर्ती जतन करणे, त्यावर अभ्यास करणे हा अध्याय महाविद्यालयाच्या इतिहास विभागात सुरू झाला.

सध्या 10 विरगळी, विठ्ठल, सती, नंदी यांच्या पुरातन मुर्ती वेगवेगळ्या पिंडी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या संग्रहात आहेत. त्यांची जपणूक करीत त्यांचा इतिहास लिहिण्याचे काम सध्या सुरू आहे.पुनर्लिखाण करण्यावर भर देण्यात आला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल गोडी निर्माण व्हावी. विरगळी व जुन्या पूरातन मुर्त्यांचा अभ्यास व्हावा, हीच या मागील संकल्पना असल्याचे डॉ. चाकणे यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)