इंदापूर महाविद्यालयात “टिफिन पे चर्चा’

रेडा- इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेत काम करून शिक्षण घेणाऱ्या 67 विद्यार्थ्यांनी टिफिन पे चर्चा हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून नवीन वर्षाची सुरुवात केली. प्रत्येक गुरुवारी दुपारी महाविद्यालयात योजनेचे विद्यार्थी आपापला डब्बा (टिफिन) घेऊन टेरेस हॉल किंवा गार्डनमध्ये एकत्र येऊन स्नेहभोजन घेतात. चर्चेत सहभागी होण्यासाठी नामवंत व्यक्‍तींना आमंत्रित केले जाते. त्यांच्याशी चर्चा करत असताना भोजन केले जाते.
प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि योजनेचे समन्वयक प्रा. बाळासाहेब काळे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे. पहिल्या चर्चेत प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांना निमंत्रित करण्यात आले. यावेळी डॉ. चाकणे यांनी आपले आयुष्य उलगडून दाखविले. यावेळी डॉ. शिवाजी वीर, प्रा.बाळासाहेब काळे, प्रा. रवींद्र साबळे, प्रा. युवराज फाळके, प्रा. हर्षवर्धन सरडे उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी महेश मोहिते यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)