इंदापूर महाविद्यालयात कौशल्य विकासावर भर -पाटील

रेडा- सध्याचे युग स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित व्हावेत या उद्देशाने येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कौशल्य विकासावर आधारित कोर्सेस सुरू करण्यात आल्याची माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. महाविद्यालयातील प्रथम वर्ष ते पदव्युत्तर वर्गापर्यंत विद्यार्थ्यास दरवर्षीप्रमाणे पाच कोर्सेस करता येतील तर प्रथमवर्ष ते पदवीपर्यंत तीन कोर्सेस विद्यार्थ्यास करता येतील. महाविद्यालायाने 45 कोर्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील 30 कोर्सस शंकररावजी पाटील ट्रस्टच्या माध्यमातून इंदापूर महाविद्यालयाने पाच वर्षांसाठी करार केला असून विद्यार्थ्यांना दरवर्षी यातील एक कोर्स करणे बंधनकारक राहणार आहे, यामुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्याची माहिती मिळणार असून विद्यार्थी व्यवसायाभिमुख कौशल्य प्राप्त करणार आहेत. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, संचालक विलास वाघमोडे ,उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विजय नारखेडे, डॉ. शोभा इंगवले, डॉ. पंडित परदेशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)