इंदापूर नगरपरिषदेवर जनआक्रोश मोर्चा

इंदापूर – इंदापूर नगरपरिषद अतिरिक्‍त कराच्या माध्यमातून जनतेची लूट करीत असल्याचा आरोप करीत शहरातील विविध समस्येवर नव्यानेच स्थापन झालेल्या प्रहार जनशक्‍ती पक्षाने पहिलाच प्रहार इंदापूर नगरपालिकेवर केला आहे. आज सकाळी प्रहार जनशक्‍ती पक्षाच्या वतीने इंदापूर नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.

इंदापूर शहरातील वाढीव घरपट्टी, पाणीपट्टी, शैक्षणिक कर आदी मागण्या संदर्भात साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रहार जनशक्‍तीचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अमोल कांबळे व इंदापूर शहराध्यक्ष मयूर ढावरे यांचे नेतृत्वाखाली श्रीरामवेस चौकापासून मोर्चाला सुरूवात झाली.मोर्चा संभाजी चौक मार्गे नेहरू चौक ते खडकपूरा, बाबा चौक,ते पूणे सोलापूर हायवेने नगरपरिषदेवर आणला गेला. त्यावेळी नगरपरिषदेच्या वतीने कर निरीक्षक कणसे यांनी नगरपरिषदेच्या वतीने निवेदन स्वीकारले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)