इंदापूर तालुक्‍यात भंगार व्यवसाय तेजीत

रेडा- भंगार म्हटले की, अनेकजण नाके मुरडतात. मात्र, या भंगार गोळा करण्याच्या व्यवसायावर इंदापूर तालुक्‍यातील अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. ऐन दुष्काळी स्थितीत भंगार वेचण्याच्या कामातून शेकडो हातांना रोजी-रोटी मिळत असल्याने दिवाळी सणाच्या तोंडावर ग्रामीण भागातील अनेक कुटुंबानी तग धरला आहे.
इंदापूर तालुक्‍यांतील शहरी भाग सोडला व उजनी जलाशय परिसरातील गावे सोडली तर मात्र, दुष्काळाच्या छायेत जनता नागरीक होरपळत आहेत. एकीकडे पाऊस पाणी नसल्यामुळे रोजगाराच्या नव्या वाटा शोधार्थ अनेक कुटुंबानी तालुका सोडून पोट भरण्यासाठी बाहेर पलायन केलेले आहे. तर जवळपास काहिच आर्थिक स्त्रोत नसताना केवळ जनमानसात आपली प्रतिमा खराब नको म्हणून, कित्येकांनी हाताला काम नसल्यामुळे भंगारचा व्यवसाय सुरू केला आहे.
बावडा, भिगवण, इंदापूर, निमगाव केतकी, भवानीनगर, नीरा नरसिंहपूर परिसरात भंगार व कबाडी वस्तू घेण्याची दुकाने गाव सोडून असली तरी देखिल वर्दळीची आहेत. तालुक्‍याच्या ठिकाणी व गाव खेड्यांत आता चांगला पैसा देणारा व्यवसाय म्हणून अनेकांनी भंगार धंदा सुरू केला आहे. वरवर हा कचऱ्यांचा वाटणारा व्यवसाय रगड पैसा देणारा ठरत आहे. या व्यवसायातील कमाईसाठी शिक्षणाची डिगरी व जास्त पैसा लागत नाही; परंतु व्यावसायिक कौशल्य व माणसे जोडण्यांची हातोटी व प्रसंगी दोन देणे-घेणे तयारी असणारी मंडळी या भंगार धंद्यात उतरली आहे. भंगार गोळा करण्यासाठी हातठेला घेऊन शहरभर व गावकडे फिरणाऱ्या या मुलांना आर्थिक गुंतवणूक करावी लागत आहे. दिवाळी सणाच्या लगबगीने घराघरात चाललेली तयारी, त्यामुळे नव्या वस्तू घरात अन्‌ जून्या वस्तूंना भंगारचा रस्ता त्यामुळे त्यामुळे या कालावधीत भंगार धंदा चालवण्यासाठी संधी प्राप्त झालेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)