इंदापूर तालुक्‍यातून संपाला संमिश्र प्रतिसाद

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर शासनाचे वर्ग 1 व वर्ग 2 चे सर्व अधिकारी कार्यालयात उपस्थित होते. तर न्यायालयीन कामकाज सुरुळीत सुरू होते.
राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी तीन दिवसांच्या (7 ते 9 ऑगस्ट) पुकारलेल्या संपात इंदापुरातील तहसीलदार कार्यालयातील सर्व कर्मचारी संपावर गेलेले आहेत. तर इंदापूर तालुका समन्वयक शिक्षक समितीने सुरू असलेल्या संपात सक्रिय सहभाग नोंदवून निषेध नोंदविला आहे. इंदापूरचे तहसील कार्यालयातील सर्व 115 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. तर पंचायत समितीचे प्रशासकीय कार्यालयातील सर्व 93 कर्मचारी कामावर उपस्थित होते. फक्‍त कृषी, आरोग्य, अर्थ, पशुसंवर्धन, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, संपात सहभागी झाले आहेत.तर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बहुतेक शाळेतील संपावर गेले आहेत. शिक्षकांच्या संघटनांनी 980 शिक्षक संपावर गेले आहेत असे सांगितले आहे. मात्र इंदापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले. इंदापूरचे दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सर्व कर्मचारी कामावर हजर होते. त्यामुळे न्यायालयातील कामकाज दिवसभर सुरळीत सुरू होते.
राज्य सरकारच्या कृषी खात्याच्या कार्यालयातील बहुतेक कर्मचारी उपस्थित होते, तर अगदी थोडे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. जलसंपदा खाते व कृष्णाखोरे महामंडळातील सर्व कर्मचारी कामावर उपस्थित होते. तसेच सहकार खात्यातील सर्व कर्मचारी कामावर उपस्थित होते; परंतु त्यांनी काम बंद आंदोलन केले. तर दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व कर्मचारी कामावर उपस्थित होते. तसेच इंदापूर वनपरिक्षेत्र कार्यालयातील सर्व कर्मचारी कामावर उपस्थित होते. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यात राज्यसरकारी कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)