इंदापूर तालुक्‍यातून तुरळक प्रतिसद

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील ग्रामीण भागात भारत बंदला बावडा भिगवण व वालचंदनगर वगळता अन्य ठिकाणी प्रतिसाद मिळालेला दिसत नाही; परंतु इंदापूर शहरात सकाळच्या प्रहरापासून तालुक्‍यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांच्या बंद आवाहनाला प्रतिसाद देत सकाळी 11 वाजेपर्यंत व्यापारी वर्गाने बाजार पेठ बंद ठेवून दरवाढीच्या निषेध नोंदविला.
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महारूद्र पाटील म्हणाले की, देशात पेट्रोल व डिझेल इंधनाच्या दरवाढीचा उच्चांक झालेला आहे. डिझेल दरवाढीची झळ मध्यमवर्गीय, चाकरमानी, शेतकरी अशा सर्वांनाच पोहोचल्याने जनता होरपळून गेली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस भारत बंदमध्ये सक्रीय सहभागी झाली आहे. केलेली दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. ऍड.शुभम निंबाळकर म्हणाले की, दरवाढ झालेली सामान्य जनतेला परवडणारी नाही. राज्यातील कानाकोपऱ्यातून वारंवार निषेध व्यक्त केला जात असताना देखील एक पैसा भाजप सरकार इंधन दर कमी करीत नाही त्यामुळे जनतेने सरकारला जागा दाखवण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी तालुका कार्याध्यक्ष अमोल भिसे, इंदापूर शहर अध्यक्ष अनिल राऊत, शहर अध्यक्ष अरबाज शेख, शहर महिला अध्यक्षा उषा इंगोले यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष बापुराव जामदार, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकीता शहा, गटनेते कैलास कदम, इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा, मुकुंद शहा यांनी दरवाढिचा निषेध केला आहेत. तसेच सरकारने सुख सुविधा न पुरवता न परवडणारी दरवाढ जीवनांत आवश्‍यक असलेल्या इंधनावर लावल्याने जनतेला जगणे देखील कठीण झाले आहे. सरकारने नागरिकांचा अंत पाहू नये, असे मत इंदापूर नगरपरिषदेचे कॉंग्रेसचे गटनेते कैलास कदम यांनी व्यक्‍त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)