इंदापूर झाले गुट”खा’ मार्केट

  • तालुक्‍यातही खुलेआम विक्री; पोलीस यंत्रणेसह अन्न व औषध प्रशासनाकडून खाबुगिरी

इंदापूर – राज्य शासनाकडून गुटखा बंद करण्याची घोषणा झाली असली तरी इंदापूर तालुक्‍यात याचा बोजवारा उडाला आहे. इंदापूर शहरासह तालुक्‍यातील निमगाव केतकी, लासुर्णे, भिगवण यासह मोठ्या महसुली गावांमध्ये अवैधरीत्या गुटख्याची विक्री सुरू असताना इंदापूर पोलीस केवळ कारवाई करण्याचा फार्स करीत आहे. अन्न व भेसळ विभागही याकामी डोळे असून आंधळ्याची भूमिका घेत असल्याने खाबुगिरी होत असल्याचे चर्चा नागरिकांत आहे.
पोलीस खाते गुटखा व्यापाऱ्यांवर रेड टाकते, त्याचवेळी मांडवली केली जाते. अन्न व भेसळ विभागाला कधी तरी कळवते, पण, तोडपाणी करून आर्थिक कमाई करण्यात पोलीस व्यस्त असल्याचे चित्र आहे.
इंदापूर शहरात चाळीसफुटी रस्ता, कसबा पेठ, डॉ. आंबेडकरनगर या भागात आठ दहा जण, नरुटवाडी, गलांडवाडी नं.1 या ठिकाणी दोघे असे 12 ते 13 जण घाऊक प्रमाणात गुटखा विक्री करीत आहेत. यामध्ये दोन पोलिसांची कुटुंबे सक्रिय असल्याची कुजबुज आहे. वालचंदनगर व बारामतीमधून इंदापूरात गुटखा येतो. गुटख्याचे एक पाकिट घाऊक विक्रेत्यांना 780 रुपयांना मिळते ते येथील पानटपरीवाले व इतरांना 800 रुपयांना विकले जाते. गोव्याचे पॅकिंग 240 रुपयांना मिळते. ते 270 रुपयांना विकले जाते. मिक्‍स गोवा गुटख्याचे पॅकिंग 135 रुपयांना मिळते ते 150 रुपयांना विकले जाते. पोलिसांची नियमित “व्हिजीट’ असते, त्यामुळे गुटखा विक्री निर्धास्तपणे सुरू आहे. या आधी शहरात दोन ते तीनच घाऊक गुटखा विक्रेते होते. बक्कळ कमाई होत असल्याचे लक्षात आल्यानंतर घाऊक विक्रेत्यांची संख्या वाढत गेली आहे. यातून सौदेबाजी सुरू झाली, तू नाही तर दुसरा शोधतो…, यातून अनेक विक्रेते गुटखा विक्रीसाठी तयार होत गेले. यातूनच गुटखा विक्री जोरदारपणे सरू आहे.
गुटख्याचा टेम्पो लुटणाऱ्या टोळक्‍याची व गुटखा तस्करी करणाऱ्यांची वाटाघाटी फिस्कटवून (नोव्हेंबर 2017 मध्ये) टेम्पोसह सर्व मालावर कब्जा करीत इंदापूर पोलिसांनी जवळपास 11 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यामध्ये 52 माणिकचंद गुटखा पिशव्या, 130 विमल गुटखा व13 इतर गुटख्याचा समावेश होता. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला कळवूनही त्यानंतर बरेच दिवस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत (दैनिक प्रभातसह) माध्यमांनी वृत्तांकन केल्यानंतर इंदापूर पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्यापैकी 20 टक्केच गुटखा पुण्याच्या अन्न व औषध प्रशासनाकडे दिला, उर्वरित 70 टक्के मुद्देमालाचे काय? ही बाब आजही गुलदस्त्यातच आहे. आजही, इंदापुरात विक्रेत्यांवर कारवाई करताना पोलीय यंत्रणा “विशेष’ सुट देत असल्यानेच इंदापुर शहरात गुटखा विक्रीचे मार्केट वाढत असल्याचे उघड आहे.

  • अवैध गुटख्याची तस्करी नवी नाही
    इंदापूर शहर हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर वसलेले आहे, त्यामुळे अवैध मार्गाने कर्नाटकहून सोलापूर मार्गे जाणारा गुटखा इंदापुरातून पुढे जातो. त्यामुळे गुटख्याची गाडी लुटण्याचे प्रकार या मार्गावर सर्रास होत असतात. इंदापूर बायपासला नेहमी या गुटख्याची लुट होते. बहुतांशी वेळा सेटलमेंट होवून अशा गाड्या पुणे तसेच मुंबई मार्केटकडे रवाना होतात. गुटख्यातून अशा प्रकारे होणारी लाखोंची तस्करी पोलीस प्रशासन व अन्न, औषध प्रशासन कशी रोखणार, याबाबत शंकाच आहे.

इंदापूर तालूक्‍यात अन्न व औषध प्रशासनाकडून आतापर्यंत सहा कारवाया केल्या गेल्या आहेत. लासुर्णे येथील प्रशांत गांधी यांच्यावर 25 लाखांचा गुटखा आढळल्याप्रकरणी खटला दाखल आहे. दुसरा खटलाही 16 लाखांचा गुटखा सापडल्याप्रकरणी प्रस्तावित आहे. आजही आमची टीम इंदापूर तालुक्‍यात वॉचवर असते. लासुर्णे येथे मंगळवारी (दि. 20) कुठेही आम्हाला गुटखा आढळून आला नाही. पुणे कार्यालयात कर्मचारी कमी आहेत. सध्यस्थितीला कार्यालयात फक्त 27 कर्मचारी आहेत. एखाद्या ठिकाणी कारवाई करायची असल्यास कमीत कमी 7 ते 8 कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असते. कमी स्टाफमुळे सगळीकडे आम्ही पोहचू शकत नाही. जेवढा माल हाती येईल तेवढीच कारवाई करण्यात येते. जर, कुणाला गुटखा तस्करीची माहिती असल्यास तसे कळवावे.
– एस. बी. अंकुश, अन्न सुरक्षा अधिकारी, पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)