इंदापूरात हनुमान जयंतीनिमित्त कीर्तनाचे आयोजन

इंदापूर- हनुमान जयंतीच्या निमित्ताने जय बजरंग ग्रुप व आव्हान प्रतिष्ठान यांच्या वतीने हभप शिवराम चोरमले, दिनेश गायकवाड, सुरेश फलफले महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन इंदापूरमधील बाबा चौक, वडार समाजमंदिर येथे शनिवारी (दि. 31) इंदापूर येथे करण्यात आले आहे. सर्व जाती धर्मांतील लोकांना एकत्रित घेऊन जयंती साजरी करणार असल्याची माहिती जय बजरंग ग्रुपचे अध्यक्ष अनिल पवार यांनी दिली.
यंदाच्या हनुमान जयंतीला अनावश्‍यक खर्च टाळून पारंपरिक पद्धतीने जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंती मिरवणूक कायदा आणि सुव्यस्थेचे पालन करून शांततेत पार पाडण्याचे आश्वासन मिरवणूक अध्यक्ष रोहिदास पवार यांनी दिले आहे. तालुक्‍यात विविध ठिकाणी शनिवारी जयंती साजरी करण्यात येणार असून शहरातील जयंती मिरवणूक दुपारी 2 वाजता काढण्यात येणार आहे. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पिंटू घोडके, लखन चौगुले, सूरज पवार, अविनाश चौगुले, जयवंत चव्हाण, आकाश देवकर यांची कमिटी नेमण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)