इंदापूरात माणूसकीचा स्नेह मेळावा उत्साहात

रेडा- युवा क्रांती प्रतिष्ठान, लोढा मित्र परिवार व जैन संघटना इंदापूरच्या वतीने आयोजित माणूसकीचा स्नेह मेळावा या कार्यक्रमात निराधार व विधवा महिलांना साडीचे वाटप करण्यात आले. तसेच अनाथ, मतिमंद मुले, सफाई कर्मचारी, ऍम्बुलन्स चालक व वृद्ध आश्रमातील लोकांना कपडे व स्नेह भोजन देण्यात आले. इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकीता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुंकुद शहा, मोहित अचलिया, अनिल पिपावत, धरमचंद लोढा, प्रशांत शिताप यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सोलापूर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)