इंदापूरातील अतिक्रमणांवर आज हातोडा

इंदापूर – इंदापूर नगरपालिकेच्या, सरकारी हद्दीत अतिक्रमण करुनर इमराती, टपऱ्या, पत्र्याचे शेड उभी केली आहेत. या अतिक्रमणावर बुधवारी (दि. 28) सकाळी सात वाजता इंदापूर नगरपालिकेचा बुलडोझर फिरणार आहे. इंदापूर नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, महसूल, पोलीस खाते यांच्या संयुक्‍त विद्यमाने ही धडक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई कारताना कुणी अडथळा आणू नये म्हणून राज्य राखीव पोलिस बल (एसआरपी) व इंदापूर, बारामती, वालचंदनगर, दौंड येथून जादा पोलीस कुमक मागविण्यात आली आहे. या होणाऱ्या कारवाईमुळे अनेक बड्या बड्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून अतिक्रमण काढण्याची करावी अशी फक्त चर्चा सुरू होती. दररोज किमान एकातरी ठिकाणी सरकारी जागेवर अतिक्रमण होत होते; परंतु आपले कोणीही अतिक्रमण काढणार नाही, या भवनेतून रोज अतिक्रमणात वाढ होत होती. संपूर्ण शहरालाच अतिक्रमणे वेढा घातला आहे. त्यामुळे ही कारवाई एक किंवा दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्‍यता कमी आल्याने किमान 15 दिवस तरी कारवाईस लागण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)