इंदापूरमध्ये राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात फेब्रुवारीत

बावडा- ग्रामीण भागातील नवोदित कलाकार व दिग्दर्शकाना हक्‍काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी इंदापूर येथे लघू चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी ही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी माहिती फेस्टिवलचे दिग्दर्शक सोमनाथ जगताप यांनी दिली. ग्रीनवुड क्रिएशन मार्फत नवोदित कलाकार आणि दिग्दर्शकांसाठी हक्‍काचे व्यासपीठ मिळावे म्हणून दि. 10 ते 12 फेब्रुवारी 2019 रोजी केशर चित्रपटगृह इंदापूर (जि. पुणे) येथे तिसऱ्या राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. सलगत दोन वर्षे महाराष्ट्र, गुजरात, कोलकत्ता, तामिळनाडू, नवी दिल्ली, राजस्थान, आसाम, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओरिसा आदी राज्यातील लघु चित्रपट सहभागी झाले होते. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट दिग्दर्शक लेखक संकलन संगीत अभिनय पटकथा बेस्ट आदी विविध गटातील स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम उत्कृष्ट लघू चित्रपटासाठी रोख रुपये 15 हजार व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी रोख दहा हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकासाठी सात हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. महोत्सवाचे जुरी सदस्य म्हणून चंद्रशेखर जोशी हे काम पाहणार आहेत. महोत्सवात आपला लघु चित्रपट घेऊन सहभागी होण्यासाठी प्रवेशिका दि. 20 जानेवारी 2019 पर्यंत स्वीकारल्या जातील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)