इंदापूरच्या सौंदर्य वाढीसाठी प्रयत्न करावा

रेडा- इंदापूर नगरपरिषदेच्या घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा देण्यासाठी आग्रह विद्यार्थ्यांनी आपल्या घरी धरला पाहिजे. शहरात 30 ते 35 ठिकाणी डस्टबीन ठेवल्या आहेत. जोपर्यंत आपण स्वच्छताप्रिय होत नाही, तोपर्यंत आपले शहर बदलणार नाही. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छता जनजागृती चळवळ सर्वत्र पोहोचवली पाहिजे. दिवाळीमध्ये आपण सर्वांनी एक झाड लावून पर्यावरणीय समतोल राखून शहराचे नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकीता शहा यांनी केले.
नारायणदास रामदास हायस्कूल येथे इंदापूर नगरपरिषद आणि कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण 2019 अभियानांतर्गत “करके तो देखो’च्या माध्यमातून स्वच्छता साक्षरता प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा शहा बोलत होत्या.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा आणि प्रशालेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणदास रामदास प्रशालेतील 4124 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. समन्वयक प्रा. गौतम यादव, डॉ. गजानन कदम आणि 157 स्वयंसेवकांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक गजानन पुंडे यांनी प्रास्ताविकात प्रश्नमंजुषा स्पर्धेचा उद्देश सांगितला. यावेळी संस्थेचे सचिव मुकुंद शहा, मुख्याध्यापक ज्ञानदेव घोगरे, नजीर मोमीन, झुंबर घाडगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन भोसले यांनी केले. तर अशोक चिंचकर, किरण मोदळे, सुशील भालेराव, नयीम शेख, शिवराज परमार, भागवत मखरे, अल्ताप पठाण यांनी ही स्पर्धेसाठी परिश्रम घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)