रेडा- इंदापूर पंचायत समितीच्या पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी घनश्‍याम दराडे यांच्या मनमानी कार्यपद्धतीची खातेनिहाय चौकशी करून त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने इंदापूर तालुका अध्यक्ष नीळकंठ गिरी व सचिव लक्ष्मीकांत जगताप यांनी पुणे विभागीय आयक्‍त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. संबंधीत विभागाने दराडे यांच्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडणात येइल असा इशारा ही ग्रामसेवक संघटनेने दिला आहे.
पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी घनश्‍याम दराडे आर्थिक,मानसिक व मनमानी प्रशासकीय कार्यपद्धतीस कंटाळून इंदापूर तालुक्‍यातील ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज करणे कठीण झाले आहे. त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे ग्रामपंचायतीच्या सामाजिक व विकासात्मक कार्यावर गंभीर परिणाम होत आहे. ग्रामसेवकांना नाहक आर्थिक, मानसिक त्रास देत आहेत. शिवाय चौकशीच्या नावाखाली चौकशी आदेशातील नमुद मुद्‌द्‌यांशिवाय अनावश्‍यक मुद्‌द्‌यांची तपासणी करून, किरकोळ बाबींना मोठ्या स्वरुपात रंगवून दाखवून ग्रामसेवकांचे मानसिक संतुलन बिघडविणे, खच्चीकरण करणे तसेच पैशांची मागणी करून ग्रामसेवकांना निलंबित करण्याची धमकी देणे आदी त्रासदायक गोष्टींचा सामना तालुक्‍यातील ग्रामसेवकांना करावा लागत आहे.
यामुळे विस्तार अधिकारी दराडे यांना सेवेतून निलंबित करून खातेनिहाय चौकशी सुरु करणेसाठी ग्रामसेवक संघटनेने आंदोलन हाती घेतले आहे. त्यासाठी आज (सोमवारी) एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले तर शनिवारी (दि. 25) तालुक्‍यातील ग्रामसेवक काम बंद आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)