इंदापूरच्या प्रशासकीय भवनाचे आज उद्‌घाटन

रेडा-इंदापूर तालुक्‍यांतील तहसीलदार कार्यालय हे 1884 साली त्यावेळचा विचार करून बांधले आहे. मात्र आजच्या काळात येथे नागरिकांना रस्ता, पार्किंग व इतर सुविधा अपुऱ्या पडत आहेत. तसेच महत्त्वाची समजली जाणारी शासकीय कार्यालये खासगी जागेत सुरू होती, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत होता. याला पर्याय म्हणून अद्ययावत प्रशासकीय इमारत तब्बल 1293.36 लक्ष रक्कम खर्चून उभी झाली आहे. या तालुक्‍यांच्या वैभवात भर घालणाऱ्या या प्रशासकीय भवन इमारतीचे शनिवारी (दि. 19) अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे हस्ते व आमदार दत्तात्रय भरणे यांचे अध्यक्षस्थेखाली उद्‌घाटन पार पडणार आहे, अशी माहिती तहसीलदार श्रीकांत पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय वैद्य यांनी दिली.
याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, नगराध्यक्षा अंकिता शहा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, पंचायत समिती सभापती करणसिंह घोलप, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम उपस्थित राहणार आहेत.

  • दहा कार्यालये एकाच ठिकाणी
    नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या प्रशासकीय भवनामध्ये दहा कार्यालयांचे कामकाज एकाच ठिकाणी सुरू राहणार आहे. 200 आसन क्षमतेचे मिटींग हॉल, सेतू सुविधा, उपहारगृह, विद्युत उद्‌वाहन, बाग बगिचा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अद्ययावत फर्निचर अशी सुविधा उपलब्ध होणार आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर दुय्यम निबंधक कार्यालय, उपकोषागार कार्यालय, सेतु कार्यालय, उपहारगृह, तसेच पहिल्या मजल्यावर तालुका कृषी कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, उपअभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, वजन मापे कार्यालय, सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, सहायक लेखा परीक्षण कार्यालय, असे कार्यालयाचे कामकाज चालणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)