इंदापूरकरांना मान्सून पूर्व पावसाची प्रतिक्षा

नमसाखर -वाढलेले तापमान कायम असून, वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्‍यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. त्यातच आठवडाभरापासून वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. तरी तापमान 30 ते 40 अंशांच्या दरम्यान कायम राहत आहे. काही दिवस दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असला, तरी उकाडाही जाणवत होता. गेल्या आठवड्यात सूर्य आग ओकत होता.

मे “हीट’च्या दुसऱ्या आठवड्यात तर तापमान 43 अंशांवर कायम असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले होते. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतात मात्र, अद्याप तो कोळसळा नसल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत केवळ पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र, तो बरसत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली असून तो मान्सून पूर्व पावसाच्या प्रतिक्षेत असून नागरिकांनासह शेतकऱ्यांचे लक्ष अभाळाकडे लागून आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)