इंदापुरात स्वच्छतेसाठी अधिकाऱ्यांच्या हातात झाडू

रेडा- स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या अंतर्गत सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत इंदापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर तसेच अण्णा भाऊ साठेनगर (वार्ड क्र. 5) मध्ये नगराध्यक्षा अंकिता मुकंद शहा, आरोग्य सभापती राजश्री अशोक मखरे यांनी कर्मचारी, नागरिकांसमवेत बुद्ध विहार आणि परिसराची स्वच्छता करून या मोहिमेस गती दिली आहे.
ऐके काळी इंदापूर शहराची “गंदापूर’ म्हणून पुणे जिल्ह्यात मोठी चर्चा होती मात्र, थेट नगराध्यक्ष म्हणून जनतेतून विजयी झालेल्या नगराध्यक्षा अंकीता शहा यांनी इंदापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी पहिल्या दिवसांपासून स्वच्छतेला सुरुवात केली तसे पाहिले तर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्षा यांनी हाती झाडू घेतलेचे उदाहरण आहे.
वार्ड ऑफिसर योगेश सरवदे आणि भागवत मखरे यांनी या प्रभागात घरोघरी जावून स्वच्छता ऍप आणि जादुई टोकरीची माहिती दिली आहे. नागरिकांचा सहभाग उस्फुर्तपणे वाढविण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छतेची जनजागृती केली जात आहे. स्वच्छतेनंतरच्या छोटेखानी कार्यक्रमाच्यावेळी शिवाजी तानाजी मखरे, ऍड. किरण लोंढे, शुभम मखरे, तेजस मखरे, सिद्धार्थ मखरे यावेळी उपस्थित होते.

  • स्वच्छता सर्वेक्षणाचे वातावरण
    इंदापूर नगरपरिषदेने 2018 च्या स्वच्छ सर्वक्षण मोहिमे अंतर्गत उत्कृष्ट कार्य करीत देश पातळीवर आपला ठसा उमटवित 5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळविल्याने नगरपालिकेने यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याचा चंग बांधला असल्याने शहरात सध्या स्वच्छता सर्वेक्षणाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)