इंदापुरात राष्ट्रवादीचे “जवाब दो’

गांधी जयंतीनिमित्त मौन पाळत केले आंदोलन

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसने महत्मा गांधी जयंती निमित्ताने मौन पाळत “जवाब दो आंदोलन’ केले.
गांधी जयंती निमित्ताने आज (मंगळवारी) इंदापूर नागर पालिकेसमोर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन सकाळी 9 ते 12 असा तीन तास मौन पाळून, केंद्र व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी माजीमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या वतीने “जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, हेमलता माळुंजकर, राजश्री मखरे, अरबाज शेख, अविनाश मखरे, छगन तांबिले, हनुमंत कोकाटे, रणजित पवार, सागर मिसाळ, बाळासाहेब व्यवहारे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
अध्यक्ष महारूद्र पाटील म्हणाले की, महात्मा गांधीजींचे विचार पायदळी तुडवून मनुवादी विचारांचे उदात्तीकरण करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महात्मा गांधी जयंतीनिमित्त इंदापूर तालुका राष्ट्रवादी धरणे आंदोलन करत आहोत. केंद्र व राज्य सरकारने मनुवादी विचारांची पाठराखण करताना समस्त भारतीयांच्या माथी पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा बोजा टाकला आहे. तसेच शेतकरी कर्जमाफी करणार, दोन कोटी तरुणांना रोजगार देणार, शेती मालाला दिडपट हमी भाव देणार, 15 लाख रुपये प्रत्येक खात्यावर जमा करणार, अशा भूलथापा मारून जनतेची घोर फसवणूक केली आहे, अशी टीका त्यांनी केली.

  • सरकारने जनतेत अविश्‍वास निर्माण केला असून, राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर, काळापैसा, खात्यात 15 लाख जमा, मेक इन इंडिया, बेरोजगारांना रोजगार, शेतकरी कर्जमाफी, मुद्रा लोन, बुलेट ट्रेनची अवास्तव स्वप्न, यामध्ये सपशेल अपयशी ठरले असून, त्यांनी समाजातील सर्वस्तरातील नागरिकांची फसवणूक केली आहे.
    – प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
What is your reaction?
12 :thumbsup:
16 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
3 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)