इंदापुरात राष्ट्रवादीचा आज कार्यकर्ता मेळावा

रेडा- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवार दि. 15 मार्च रोजी सकाळी दहा वाजता इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार उभे राहणार आहेत. या लोकसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत. मेळाव्यास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)