इंदापुरात महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा

रेडा- इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये पुणे जिल्हा आंतर महाविद्यालयीन मुलांच्या कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट देऊन खेळाडूंना मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील 96 संघ सहभागी झाले. स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या हस्ते, तसेच बोर्ड ऑफ स्पोर्टस सदस्य डॉ. गायकवाड, अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. गिरीश दामले आणि प्रा. रावसाहेब गरड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सातारा आणि कऱ्हाड या दोन तालुक्‍यांतीलपंचानी स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य केले. यावेळी संस्थेचे सचिव मुकुंद शहा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, शेखर पाटील, डॉ. शिवाजी वीर, प्रा. बाळासाहेब काळे उपस्थित होते. इंदापूर कबड्डी क्‍लबचे खेळाडू, तसेच मार्गदर्शक यांचे देखील या स्पर्धेत सहकार्य मिळाले. यावेळी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. भरत भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. फिरोज शेख यांनी केले, तर प्रा. बापूसाहेब घोगरे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
10 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
13 :blush: Great
3 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)