इंदापुरात नवीन प्रशासकीय इमारतीच्या पायाभरणीचा आज शुभारंभ

रेडा- इंदापूर नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत व शॉपींग सेंटरच्या अंदाजपत्रकीय 8 कोटी रूपयांचा विकासकामांचा पायाभरणीचा शुभारंभ शनिवार (दि. 23) सायंकाळी 4 वाजता होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कै. शंकररावजी पाटील मार्ग, 100 फुटी रोड या ठिकाणी जाहीर सभा नगरपरिषद येथे सायंकाळी पाच वाजता होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा आणि गटनेते नगरसेवक कैलास कदम यांनी दिली. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, भोरचे आमदार संग्राम थोपटे, पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले उपस्थित राहणार आहेत. शहरामध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नगरपालिकेच्या तीन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)