इंदापुरात अतिक्रमण कारवाईचा फार्स?

बिजवडी- इंदापूर नगरपालिकेने आठ दिवसांपूर्वी अतिक्रमणधारकांवर दुर्लक्ष करीत फक्‍त हातावर पोट असणाऱ्या टपरीधारकांवर कारवाईचा फार्स केला, अशा प्रतिक्रिया इंदापूरात उमटल्या असून इंदापूरात अतिक्रमणातील बेसुमार वाढलेल्या अतिक्रमीत टपरीधारकांना अभय देवून दोनच ठिकाणच्या टपऱ्या हटवण्याचा फार्स करून नगरपलिकेने काय साधले, असा यक्ष प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.
जेथील अतिक्रमणे हटवले पाहिजे ते नाही हटवले. ज्या ठिकाणी कोणाचे काहीच अडचण नव्हती ना तक्रार होती, अशा ठिकाणची मात्र, न सांगता अतिक्रमणे हटवली आहेत. मात्र, महामार्गाच्या बाजूची अतिक्रमणे का हटविण्यात आली नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने बुधवारी (दि. 16) सकाळी अचानक धडक कारवाई करत ज्यांची हातावर पोटे आहेत, अशांनी अतिक्रमण करून थाटलेले व्यवसाय मोडून काढली मात्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व इंदापूर न्यायालयाच्या बाजूची अशा 25 च्या आसपास असणाऱ्या टपऱ्यांची अतिक्रमणे काढून टाकली. मात्र, शहरातील महामार्गावरील असणाऱ्या शेकडो अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याचे टाळले. शहरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा कॉंग्रेस भवन ते बसस्थानकापर्यंतच्या भागात व्यापाऱ्यांनी शासनाची जागा अडवत अगदी फुटपाथवर थाटलेली दुकाने, श्री नारायणदास रामदास हायस्कूल ते इंदापूर महाविद्यालयाच्या दरम्यान गाळेधारकांनी वाढलेली अतिक्रमणे काढण्याची तसदी नगरपरिषदेने घेतली नाही याबद्दल सर्वसामान्य नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे. महामार्गाच्या लगत असणाऱ्या फुटपाथवरून नागरिकांना कधी चालताना कुणी पाहिले नाही. ज्या कारणासाठी फुटपाथ केला आहे. त्याचा उद्देश सफल झाला नाही. उलट नगरपालिकेला थेट आव्हान देत फुटपाथवरच व्यावसायिकांनी व्यवसाय थाटले आहेत. या व्यावसायिकांना कारवाईची कसलीच फिकीर नाही. नगरपालिकेचे कर्मचारी प्रत्येक व्यावसायिकांकडून मात्र, दररोज कर पावती देवून कर वसूल करतात. मात्र त्यांना अभय देत नगरपालिका कारवाईबाबत नरम भूमिका घेत आहे का? त्याचप्रमाणे जनतेच्या सेवेचे व्रत धारण करणाऱ्यांनी हे नियम पाळले नाही तर ते कुणाला सांगणार असा सवाल आहे.

  • आपण कुणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याबाबत कर्मचाऱ्यांना सांगितले होते.
    – रामनिवास झंवर, मुख्याधिकारी, इंदापूर नगरपालिका

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)