इंदापुरातून “राष्ट्रवादी’ला अधिकाधिक मतांचे दान

आमदार दत्तात्रय भरणे; खासदारांच्या विकासकामांमुळेच विरोधकांना थारा नाही

रेडा- बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर तालुक्‍याचा समावेश होत असल्यामुळे या तालुक्‍याला विकासात्मक दृष्ट्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने विचार केला आहे. राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून निधीची मोठी मदत यांच्याद्वारे होत असल्याने याचे लोकसभा निवडणुकीत इंदापुरातून अधिकाधिक मतांचे दान सुप्रिया सुळे यांना देण्याची मोठी जबाबदारी होती, मतदारांनीही त्यांचे प्रेम मतदारांनी मतपेटीतून दाखवून दिले, असे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार म्हणून मोठ्या सुप्रिया सुळे मताधिक्क्‌याने विजयी झाल्या, या विजयाचा आनंद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी फटाके वाजवून तसेच साखर, पेढे वाटप करून साजरा केला. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनाही कार्यकर्त्यांनी उचलून घेतले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, इंदापूर तालुक्‍याच्या जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून सातत्याने मोठी मदत होत आहे; त्यामुळे येथील मतदार या पक्षाला विसरू शकत नाहीत.तालुक्‍यातील विविध संस्था तसेच ग्रामपंचायती पक्षाच्या विचाराच्या असल्याने गावपातळीपर्यंत व सामान्य जनतेपर्यंत विकास पोहोचला आहे. हा विकास जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भूमिकेनुसार विकास कामे पूर्ण होईपर्यंत सातत्याने लक्ष देणे, पाठपुरावा करणे हे तालुक्‍याचा लोकप्रतिनिधी म्हणून सुळे यांनी केलेल्या कामाची पोचपावती मतदारांनी दिल्याचा आनंद आहे. मागील लोकसभा निवडणुकीत जरी भाजपची, मोदी लाट होती तरी देखील तालुक्‍यातील जनता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. यावेळीही जनतेने सुळे यांना साथ दिली, याबद्दल जनतेचे आभार, ही साथ अशीच कायम राहिल, असा विश्वास वाटतो, असेही आमदार भरणे यांनी सांगितले.

  • इंदापुरातून लीड देण्यात यशस्वी…
    इंदापूर तालुक्‍यातून खासदार सुप्रिया सुळे यांना एक लाख पाच हजारांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. मी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून इंदापुरात काम करीत असतानाही सुप्रिया सुळे यांच्या सहकार्यातून तसेच पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या मूलभूत सुख सुविधा पुरविण्यासाठी कोठेही कमी पडलो नाही. तालुक्‍यातील गावागावात झालेली विकास कामे यातूनच मतदारांचा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसने संपादन केला आहे. इंदापुरातील कार्यकर्त्यांनी तालुक्‍यात आघाडीचा धर्म पाळून काम झाले. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचाही सुळे यांचा विजयात मोठा वाटा आहे, असेही आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)