इंदापुरातील शेतकऱ्यांना शेततळ्यांचा आधार

जानेवारीपासून आजपर्यंत 70 प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले
इंदापूर तालुक्‍यात जिल्हास्तरीय अनुदान मिळण्यासाठी 29 लाभार्थ्यांचे 56 लाख रुपये अनुदानाचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. जानेवारी महिन्यापासून आज अखेरपर्यंत शेततळ्यांचे 70 प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. अस्तरीकरणाचे 206 प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. तसेच “मागेल त्याला शेततळे’ ही योजना सलग सुरू रहाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सूर्यभान जाधव यांनी केले.

पावसाळापर्यंतचा पाणी प्रश्‍न मिटला : 2016 ते 18 मध्ये 406 कामे पूर्ण

इंदापूर- मागेल त्यास शेततळे या योजनेतून इंदापूर तालुक्‍यात झालेल्या शेततळ्यांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने, प्रत्यक्ष पावसाळ्यापर्यंतच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न शेततळ्यांनीच मिटवला आहे. शेततळीच शेतकऱ्यांचा आधार ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागेल त्यास शेततळे या योजनेतून इंदापूर तालुक्‍यात 2016 ते 18 या कालावधीत तालुक्‍यात 406 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. त्यामधील पाण्याचासाठा ही समाधानकारक आहे, त्यामुळे पावसाळ्यापर्यंत पिकांसाठी चांगल्याप्रमाणात पाणी उपलब्ध होवू शकेल, असा आशावाद तालुका कृषी अधिकारी सूर्यभान जाधव यांनी व्यक्त केला.
सूर्यभान जाधव म्हणाले की, 2016 ते 2018 या दोन वर्षांच्या काळात या योजनेतून 925 शेततळी मंजूर झाली. त्यापैकी 406 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शेततळ्यांच्या कामात मातीकामाला 50 हजार रुपये, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून अस्तरीकरणासाठी सव्वा लाख रुपये अनुदान मिळते. मोठ्या आकाराच्या तळ्यास कुंपणासाठी देखील सुमारे 3 लाख 29 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी लाभार्थी निवडते. अनुदान देण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होते. तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत असते. तसेच या शेततळ्यांना अस्तरीकरण करण्यात येत असल्याने किती ही तीव्र स्वरुपाचा उन्हाळा असला तरी बाष्पीभवन वगळता, पाण्याच्या साठ्यात घट होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दम्यान, शासनाने नियुक्‍त केलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने तालुक्‍यास भेट देवून शेततळ्यांची पाहणी केली आहे. व कामाबद्दल समाधान व्यक्‍त केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)