इंदापुरातील अतिक्रमणांवर हतोडा

इंदापूर- इंदापूर नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने बुधवारी (दि. 16) सकाळी अचानक धडक कारवाई करीत ज्यांची हातावर पोटे असलेल्यांच्या अतिक्रमणातील 20 ते 25 टपऱ्या काढून टाकल्या. मात्र, शहरातील महामार्गावरील असणाऱ्या शेकडो अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याचे टाळले. कारवाईवेळी एक जणाने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
शहरात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा कॉंग्रेस भवन ते बसस्थानकापर्यंतच्या भागात व्यापाऱ्यांनी शासनाची जागा अडवत अगदी फुटपाथवर थाटलेली दुकाने, श्री नारायणदास रामदास हायस्कूल ते इंदापूर महाविद्यालयाच्या दरम्यान गाळेधारकांनी वाढलेली अतिक्रमणे काढण्याची तसदी नगरपरिषदेने घेतली नाही याबद्दल सर्वसामान्य नागरिकांनी आश्‍चय व्यक्‍त केले आहे. नगरपालिकेचे अधिकारी मात्र आपण इंदापूरातील खुप मोठी कारवाई केल्याचे छाती बडवून सांगत आहेत.
सकाळी आठ वाजता सुरु झालेली ही कारवाई दुपारी तीन वाजेपर्यंत चालली. अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख सुजय मखरे, नगरअभियंता अनिल कुंभार यांच्या देखरेखीखाली ही कारवाई झाली. सकाळी आठ वाजता प्रशासकीय इमारतीच्या संरक्षक भिंतीलगतचे अतिक्रमण पाडण्यात आले. त्यावेळी एक जणाने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच अटकाव केल्याने अनर्थ टळला. नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर म्हणाले की, कुणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याबाबत कर्मचाऱ्यांना सांगितले होते असे सांगितले. मात्र शहराचे नाक असणाऱ्या प्रमुख महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याबाबत एक शब्दातही त्यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यशैलीबद्दल शंका निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)