इंदापुरचे पाणी पुण्याच्या प्रयोगशाळेत

नगरपालिकेच्या विरोधी पक्षाकडून दखल

रेडा- उजनी धरणाच्या पाण्याच्या संशोधनावरील निष्कर्ष समोर आल्यानंतर इंदापूरकरांची झोप उडाली होती. मागील अनेक वर्षांपासून इंदापूर शहराची तहान उजनी धरणावरच पाण्यावरच आहे. या निष्कर्षांमुळे इंदापूरकर घाबरुन गेले आहेत. त्यामुळे इंदापूर नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधी नगरसेवकांनी थेट इंदापूरवासियांना पिण्यासाठी मिळणारे उजनीचे पाणी तपासणीसाठी थेट पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
उजनीचे पाणी दूषित आहे. पण हे पाणी इंदापूर नगरपालिका फिल्टर व निर्जंतुकीकरण करून नागरिकांना पुरवठा करीत असते. तरीपण काही शंका या नागरिकांच्या मनात येत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी उजनीतून येणारे पाणी हे तपासून घ्यावे, असा सूर धरला. यामुळे इंदापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, गटनेते गजानन गवळी व नगरसेवक श्रीधर बाब्रस यांनी याची तातडीने दखल घेत स्वतः नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन ज्या ठिकाणी पाणी फिल्टर केले जाते. त्याची पहाणी करून तेथील पाण्याचे काही नमुने घेतले. हे पाणी प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांची स्वाक्षरी घेतले. हे पाणी सीलबंद करून पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले आहे.
उजनी धरणातील पाण्याचा सोलापूर विद्यापीठाने शास्त्रशुध्द अभ्यास केला आहे. या चाचणीत पारा, शिसे आणि अनेक रासायनिक घटक आढळून आले आहेत. यामुळे उजनी धरणातील पाणी सतत पिल्याने कॅन्सर होण्याची शक्‍यता असल्याचा निष्कर्ष विद्यापीठातील संशोधकांनी काढला होता. त्यामुळे उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावातील नागरिकांच्या आरोग्याविषयी प्रश्न उपस्थित झालेला आहे. एकीकडे इंदापूर शहरात सध्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू आहे. मागील वर्षी या अभियानात इंदापूरने स्वच्छ आणि सुंदर म्हणून नावलौकिक असलेल्या बारामतीला मागे टाकले होते. मात्र, सध्या इंदापूर शहरातील पाण्याच्या पाईपलाईनची अवस्था खराब झाली आहे. शहरातील पिण्याचा पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ही अनेक ठिकाणी ड्रेनेजच्या घाणीच्या गाळात आहे. त्याच ठिकाणी या पाईपलाईनचे जोड आहेत. त्यामुळे अशा ठिकाणातून पाणी दूषित होऊन यातून रोगराई वाढू शकते, असे आरोप विरोधीपक्ष करीत आहेत.

  • इंदापूरवासियांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा
    इंदापूर नगरपरिषदेला जरी उजनी धरणाच्या माध्यमातून पाणी पिण्यासाठी येत असले, तरीदेखील हे सर्व येणारे पाणी शुद्ध केले जाते. त्यामुळे निर्जंतुकीकरण करून शहरवासीयांना हे पाणी नगरपरिषद पुरवत असते. त्यामुळे पुरवठा होणारे पाणी हे स्वच्छ आहे, अशी माहिती इंदापूर नगरपरिषदेचे पाणीपुरवठा प्रमुख सहदेव व्यवहारे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)