रेडा- आपले शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठीचा संकल्प करून ही स्वच्छ सर्वेक्षणाची मोहिम यशस्वी व्हावी, यासाठी इंदापूरकरांनी कचरा विघटनासाठी नागरिकांना जादुई टोकरींचे वाटप केले आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते ललेंद्र शिंदे यांनी वॉर्ड क्रमांक 5 मध्ये 25, संजय शिंदे यांनी 10, तर वॉर्ड क्रमांक 16 मध्ये नगरसेविका उषा स्वामी यांनी 20 जादुई बास्केटचे वाटप केले. घरातील ओला कचरा घरच्या घरी विघटन करण्यासाठी या जादुई टोकरीचा उपयोग होतो.ओला कचऱ्यापासून सेंद्रीय खत तयार करण्यासाठी ही जादुई टोकरी उपयोगी असून या बास्केटमध्ये बायोकल्चर असून ते आय कॉलेज ने विकसीत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)