इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा: एनएच वुल्वस, डी लिंक चिताज संघांचे विजय

पुणे: एनएच वुल्वस, डी लिंक चिताज, गोल्डफिल्ड डॉल्फिन्स, टायगर्स, ओव्हन फ्रेश टस्कर्स, ट्रूस्पेस जॅगवॉर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या पीवायसी हिंदू जिमखानाच्या वतीने आयोजित इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत विजयी आगेकूच नोंदवली.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीतील लढतीत प्रसाद जाधव याच्या नाबाद 52 धावांच्या खेळीच्या जोरावर एनएच वुल्वस संघाने गुडलक हॉग्स लिमये संघावर 14 धावांनी विजय मिळवला. आत्मन बागमार(नाबाद 33 व 1-10)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर डी लिंक चिताज संघाने गोखले सिनर्जी कोब्राज संघावर 7 गडी राखून विजय मिळवला.

-Ads-

तर अन्य एका लढतीत रवी कासटच्या फटकेबाज फलंदाजीच्या जोरावर ट्रूस्पेस जॅगवॉर्स संघाने डी लिंक चिताज्‌ संघाचा 4 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कृष्णा मेहताच्या नाबाद 41 धावांच्या बळावर डी लिंक चिताज्‌ संघाने 6 षटकात 2 बाद 77 धावा केल्या. 77 धावांचे लक्ष रवी कासटच्या जलद 48 धावासह ट्रूस्पेस जॅगवॉर्स संघाने 4 चेंडू राखत 4 बाद 80 धावांसह पुर्ण केले. रवीने 18 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारांसह 48 धावा केल्या. नकुल पटेलने 19 धावा करून रवीला सुरेख साथ दिली. रवी कासट सामनावीर ठरला. तर, अन्य एका सामन्यात गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाने जीएससी पॅंथर्सवर 13धावांनी विजय मिळवत आगेकूच केली.

सविस्तर निकाल:

साखळी फेरी:

डी लिंक चिताज्‌- 6 षटकांत 2 बाद 77 (कृष्णा मेहता नाबाद 41, अक्षय ओक 20, अनुज मेहता 1-21, निरंजन गोडबोले 1-6) पराभूत वि ट्रूस्पेस जॅगवॉर्स- 5.2 षटकांत 4 बाद 80 (रवी कासट 48(18), नकुल पटेल 18, राहूल पंडीत 1-19, जयकांत वैद्य 1-17, आत्मन बागमार 1-10) सामनावीर- रवी कासट; ट्रूस्पेस जॅगवॉर्स संघाने 4 गडी राखून सामना जिंकला.

एनएच वुल्वस: 6 षटकांत 2 बाद 86 (प्रसाद जाधव नाबाद 52, अनुज लोहाडे 18, प्रशांत वैद्य 12, सिद्धांत चोपडा 1-8) वि.वि. गुडलक हॉग्स लिमये: 6 षटकांत 2 बाद 72 (देवेंद्र चितळे नाबाद 33, समीर जोग 23, अनुज लोहाडे 1-4); सामनावीर-प्रसाद जाधव; एनएच वुल्वस 14 धावांनी विजय;

गोखले सिनर्जी कोब्राज: 6 षटकांत 60 धावा (विमल हंसराज 12, विशाल गोखले 18, ईशान भाले 18, आत्मन बागमार 1-10, कृष्णा मेहता 1-11) पराभूत वि.डी लिंक चिताज: 4.4 षटकांत 1 बाद 61 (आत्मन बागमार नाबाद 33, अक्षय ओक नाबाद 22, विमल हंसराज 1-11);सामनावीर-आत्मन बागमार; डी लिंक चिताज 7 गडी राखून विजयी;

गोल्डफिल्ड डॉल्फिन्स: 6 षटकांत 1 बाद 79 (रोहन छाजेड नाबाद 33, अश्विन शहा 24, आशुतोष आगाशे 17, कर्णा मेहता 1-6) वि.वि.जीएससी पॅंथर्स: 6 षटकांत 6 बाद 66 (कर्णा मेहता 27, यश परांजपे 12, दीपक लुनावत 11, रोहन छाजेड 2-10, सिद्धार्थ अंबर्डेकर 1-13, अभिजित भाटे 1-6, नचिकेत जोशी 1-9, अनिल छाजेड 1-12); सामनावीर-रोहन छाजेड; गोल्डफिल्ड डॉल्फिन्स 13 धावांनी विजयी.

टायगर्स: 6 षटकांत 5 बाद 61 (अभिषेक ताम्हाणे 26, अमित कुलकर्णी 25, रोहित बर्वे 2-3, आशिष देसाई 1-5, हर्षद बर्वे 1-6) वि.वि. आर स्टॅलियन्स: 6 षटकांत 4 बाद 49 (रोहित बर्वे 15, हर्षद बर्वे 10, सिद्धार्थसाठ्ये 2-9, अमित कुलकर्णी 1-6, चेतन वोरा 1-13);सामनावीर-अमित कुलकर्णी; टायगर्स 12 धावांनी विजयी.

सुपर लायन्स: 6 षटकांत 3 बाद 61 (आशिष राठी नाबाद 25, रौनिक झवर 22, अंजनेया साठे 1-3, पिनाकिन मराठे 1-10, सौरभ चिंचनकर 1-10) पराभूत वि. अंजनेया ब्रेव बिअर्स: 5.3 षटकांत 2 बाद 65 (गौरव सावगावकर 19, अंजनेया साठे 10, शिवकुमार जावडेकर नाबाद 10, गिरीश मजुमदार नाबाद 19, अभिजित राजवाडे 1-7); सामनावीर-अंजनेया साठे; अंजनेया ब्रेव बिअर्स 6 गडी राखून विजयी;

ओव्हन फ्रेश टस्कर्स: 6 षटकांत 5 बाद 50 (शिरीष आपटे 20, दर्शन कांकरिया नाबाद 11, अभय बागमार 1-2, आकाश जैन 1-3, प्रतीक वांगीकर 1-6) वि.वि. कासट ड्रॅगन्स: 6 षटकांत 3 बाद 37 (गौरव कासट नाबाद 17, प्रतीक वांगीकर 11, करण बापट 1-4) ; सामनावीर-शिरीष आपटे; ओव्हन फ्रेश टस्कर्स 13धावांनी विजयी.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)