इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा: कासट ड्रॅगन्स संघाची विजयी सलामी

पुणे: गौरव कासटच्या नाबाद 39धावांच्या खेळीच्या जोरावर कासट ड्रॅगन्स संघाने जीएससी पॅंथर्सच 7 गडी राखून पराभव करताना येथे सुरु असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत विजयी सलामी दिली.

यावेळी प्रथम फलंदाजी करताना जीएससी पॅंथर्स संघाने 6 षटकांत 5 बाद 74 धावा केल्या. यात हर्ष जैनने 18 चेंडूत 44 धावा, कर्णा मेहताने 12 चेंडूत 16 धावा केल्या. हे आव्हान कासट ड्रॅगन्स संघाने 5.4 षटकांत 1 बाद 77 धावा करून पूर्ण केले. यात नितीन देसाईने 15 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 32 धावा व गौरव कासटने 18 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 39 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यावेळी सामन्याचा मानकरी गौरव कासट ठरला.

-Ads-

स्पर्धेचे उदघाटन इंडोशॉटलेचे अनिल जलिहाल, रामचंद्र राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लबचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे, क्‍लबचे मानद सचिव आनंद परांजपे, क्‍लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, होडेकचे अभिजित खानविलकर व हर्निश राजा, ब्रिहंसचे आशुतोष आगाशे, कुमार ताम्हाणे, निखिल शहा, इंद्रजीत कामठेकर, शिरीष गांधी, तुषार नगरकर, रणजित पांडे, तन्मय आगाशे सारंग लागू आणि कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल :
साखळी फेरी – जीएससी पॅंथर्स: 6 षटकांत 5 बाद 74 (हर्ष जैन 44, कर्णा मेहता 16, सिद्धार्थ बदामीकर 9, प्रतीक वांगीकर 2-9) पराभूत वि.कासट ड्रॅगन्स: 5.4 षटकांत 1 बाद 77 (नितीन देसाई नाबाद 32, गौरव कासट नाबाद 39, सतीश जैन 1-6); सामनावीर-गौरव कासट; कासट ड्रॅगन्स 7 गडी राखून विजयी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)