इंडोनेशिया नृत्य स्पर्धेत एंजल संघाची निवड

लोणी काळभोर  – कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एंजल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला. संघाची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेसाठी झाली असल्याची माहिती ओम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी दिली. या स्पर्धा गुजरात येथील अहमदाबाद शहरांत आयोजित करण्यात आलेल्या होत्या. स्पर्धेचे आयोजन इंडियन आर्ट कल्चर सोसायटी व श्री डान्स ऍकॅडमी यांच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेत भारतातील 500 शाळांतील मुलींचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या संघाने तांडव नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांसमवेत परीक्षकांचीही वाहवा मिळवली. प्रथम क्रमांक पटकावला. या संघात पलक शहा, प्रांजली शहा, प्रांजली झेंडे, ज्ञानेश्वरी तामकर, तनिष्का काळभोर, दिप्ती मोटे, रामेश्‍वरी चव्हाण, तूजा गायकवाड या विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. संघाला शाळेच्या मुख्य व्यवस्थापिका त्रिवेणी घाटे व नृत्य शिक्षिका भारती केदारी यांचे मार्गदर्शन लाभले. डिसेंबर 2018 मध्ये इंडोनेशिया देशातील बाली शहरात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत हा संघ सहभागी होणार आहे. या संघाचे अभिनंदन ओम एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा, संचालक परविण इराणी, एंजल हायस्कूलचे मुख्याध्यापक फरशीद इराणी, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अनंत कुलकर्णी यांचेसमवेत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)