इंडोनेशियाला भूकंपाचा धक्का; तिघांचा मृत्यू

जाकार्ता -इंडोनेशियाच्या मध्य भागाला बुधवारी भूकंपाचा धक्का बसला. त्यामुळे इमारती कोसळल्याच्या दुर्घटनांमध्ये तिघे मृत्युमुखी पडले. भूकंपाने 300 पेक्षा अधिक घरांचे नुकसान केले. इंडोनेशियाला हादरवणाऱ्या भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 4.4 इतकी नोंदली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य जावा प्रांतात होता. त्यामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळण्याच्या घटना घडल्या.

त्यात मृत्युुमुखी पडलेल्यांमध्ये दोन वृद्धांचा आणि एका बालकाचा समावेश आहे. जखमी झालेल्या 21 जणांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. घरांच्या पडझडीमुळे 2 हजारहून अधिक नागरिकांना तात्पुरत्या छावण्यांमध्ये हलवण्यात आले. मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी भूकंपग्रस्त भागांमध्ये 14 दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली. इंडोनेशिया हा देश भूकंपप्रवण मानला जातो. तिथे वारंवार भूकंपाच्या घटना घडतात.

-Ads-

  इराणमध्ये अणुऊर्जा केंद्राजवळ भूकंप

इराणलाही गुरूवारी भूकंपाचा धक्का बसला. त्या देशातील एकमेव अणुऊर्जा केंद्र असलेल्या बुशेहरच्या भागात हा भूकंप झाला. त्यामुळे कुठलीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. याशिवाय, अणुऊर्जा केंद्राच्या कार्यावरही कुठला परिणाम झाला नाही. इराणमधील भूकंपाची तीव्रता 5.9 इतकी नोंदली गेली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)