इंडोनेशियाला चार दिवसांत भूकंपाचे 355 धक्‍के – 319 जणांचा मृत्यू

जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियात गेल्या चार दिवसांत झालेल्या भूकंपात मरण पावलेल्यांचा आकडा 319 झाला आहे. इंडोनेशियातील लोम्बोक बेटावरील रविवारच्या तीव्र धक्‍क्‍यानंतर 355 कमीजास्त तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. पडलेल्या इमारतींखाली अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम चालू असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

भूकंपामुळे 319 जण मरण पावले असून सुमारे 1400 जण गंभीर जखमी झाले आहेत, असे इंडोनेशियाचे मुख्य सुरक्षा मंत्री विरांतो यांनी सांगितले. पुन्हा पुन्हा बसणाऱ्या भूकंपाच्या धक्‍क्‍यांमुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. सुमारे दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी निवारा देण्यात आलेला आहे. तात्पुरती उपचार केंद्रे उभारली असून जखमींवर उपचार चालू आहेत. काही ठिकाणी अन्नाची टंचाई जाणवत असल्याची माहितीही काही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)