इंडोनेशियामध्ये 7.5 रिश्‍टर स्केलचा शक्तिशाली भूकंप

पालू शहराला धडकल्या त्सुनामीच्या लाटा
जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियातील सुलावेसी बेटाला शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 7.5 एवढी होती. या भूंकपामुळे कसल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या भूकंपानंतर पालू शहरातील काही भागाला त्सुनामीच्या 2 मीटर उंचीच्या लाटा धडकल्या आहेत. यामुळे लोक भितीने सुरक्षित ठिकाणी धावत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देशाच्या आपत्ती निवारण विभागाने दिला होता. त्यानंतर काहीवेळाने त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला.

सुलावेसीच्या डोंग्गाला भागात 10 किमीवर भुकंपाचा केंद्रबिंदू होता. यानंतर काही वेळाने पुन्हा सौम्य भुकंप आला. या भुकंपाची तिव्रता या वर्षीच्या सुरुवातीला आलेला लोमबोक बेटावरील आलेल्या भुकंपापेक्षा जास्त होती. या भुकंपामध्ये शेकडो लोक ठार झाले होते. या भूकंपाचे केंद्र पालू शहरापासून 78 किलोमीटर अंतरावर आहे. या भूकंपाची तीव्रता इतकी अधिक होती की सुमारे 900 किलोमीटर दूरवर दक्षिणकडील बेटावर असलेल्या सर्वात मोठ्या माकासर शहरा पर्यंत त्याचे धक्के जाणवले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याआधी याभागात झालेल्या भूकंपामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आज झालेल्या भूकंपाची तीव्रता यार्षीच्या सुरुवातीला लोम्बोक बेटावर झालेल्या भूकंपापेक्षा अधिक आहे. डिसेंबर 2004 मध्ये इंडोनेशियाच्या पश्‍चिम भागातील सुमात्रा बेटावर 9.3 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामुळे आलेल्या त्सुनामीमुळे हिंदी महासागर क्षेत्रातील 2,20,000 लोकांचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)