इंडोनेशियात 1,200 कैद्यांचे तुरुंगातून पलायन 

जकार्ता: भूकंप आणि त्सुनामीच्या तडाख्यामुळे हादरलेल्या इंडोनेशियामध्ये सुमारे 1,200 कैद्यांनी तुरुंगातून पलायन केले आहे. सुलावेसी भागातील वेगवेगळ्या कारागृहांमधून या कैद्यांनी हे पलायन केल्याची घटना घडली आहे, असे न्याय मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. भूकंपामुळे पालू या शहरातील कारागृहाच्या भिंतींना तडे गेले होते. त्याचा फायदा घेऊन या कैद्यांनी सामूहिकपणे पलायन केले. यामध्ये अनेक कच्चे कैदी होते.
पालू आणि दोन्ग्गाला या दोन तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांना ठेवण्यात आले होते. या दोन्ही भागांना भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. भूकंपामुळे कारागृहाच्या इमारतींना धोका निर्माण होण्याची भीती कैद्यांना वाटू लागली होती. त्यामुळे तडे गेलेल्या भिंती फोडून कैदी बाहेर पळाले असावेत. केवळ जीवाच्या भीतीनेच कैद्यांनी हे पलायन केले असावे असे न्याय मंत्रालयाच्या अधिकारी श्री पुगुह उतामी यांनी सांगितले.
दोनग्गाला येथील काराग्रहाच्या इमारतीला आग लावण्यात आली आणि सर्वच्या सर्व 343 कैद्यांनी पलान केले असे त्यांनी सांगितले. या तुरुंगातील बहुतेक कैदी भ्रष्टाचार आणि अमली पदार्थविषयक गुन्ह्यातील दोषी होते. याशिवाय दहशतवादी गुन्ह्यांशी संबंधित पाच जणांना काही दिवसांपूर्वीच या तुरुंगातून हलवण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)