इंडोनेशियात विमान कोसळून 8 ठार. फक्त एक बालक वाचले 

जकार्ता (इंडोनेशिया): इंडोनेशियात शनिवारी एक विमान कोसळल्याने 8 जण मरण पावले असल्यची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या भयानक अपघातात एक बालक आश्‍चर्यकारक रीतीने वाचले आहे. कोसळलेले विमान डिमोनिम एयर या खासगी कंपनीचे होते. सदर कंपनीच्या स्विस निर्मित पिलॅट्‌स विमानात 7 प्रवासी आणि 2 वैमानिक होते. शनिवारी संध्याक़ाळी विमानाचा नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटला होता. आज सकाळी विमानाचे अवशेष ऑक्‍सिबिल पर्वतीय क्षेत्रात आढळून आले.
या दुर्घटनेत 8 जण मरण पावले आहेत, तर 12 वर्षांचे एक बालक आश्‍चर्यकारक रीतीने बचावले आहे. राष्ट्रीय परिवहन समिती या दुर्घटनेचा तपास करत असल्याचे पापुआ लष्कराचे प्रवक्ता लेफ्टनंट कर्नल डॅक्‍स सियुंदरी यांनी सांगितले विमान दुर्घटनाग्रस्त होण्यापूर्वी मोठा स्फोट झाल्याचा आवाज ओकाटेम भागातील लोकांनी ऐकला होता. मदत कार्य दुर्घटनास्थळी पोहचण्यास दोन तासांहून अधिक वेळ लागला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)