इंडोनेशियात आता ज्वालामुखीचा उद्रेक ; मदतकार्यामध्ये अडथळे

जकार्ता: इंडोनेशियात त्सुनामी आणि भूकंपामुळे हजारो लोक मारले गेले आहेत. दरम्यान, उत्तर सुलावेसीमधील माऊंट सोपुतन ज्वालामुखी जागृत झाला आहे. त्सुनामी आणि भूकंप पीडितांसाठी चालवण्यात येत असलेल्या मदतकार्यामध्ये अडथळे येत आहेत. तसेच आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीत 1234 जणांचा मृत्यू ओढावला आहे.

भूकंपामुळे पालू आणि डोंग्गाला या दोन शहरांचे अतोनात नुकसान झाले असून, बचावकार्य राबवले जात आहे, अशी माहिती एएफपी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. इंडोनेशियातील पालू भागाला या त्सुनामीचा जोरदार झटका बसला आहे.

-Ads-

विशेष म्हणजे पालू भागाची लोकसंख्या तीन लाखांच्या आसपास आहे. त्सुनामीचा लाटा अजस्त्र असल्यानं इंडोनेशियातील समुद्रकिनारील भागातील वीजपुरवठा व मोबाईल टॉवर बंद पडली असून, इंडोनेशियाचं सरकार परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)