इंडोनेशियात अरुंद दरीमध्ये बस कोसळून 21 ठार

बानदुंग (इंडोनेशिया) – इंडोनेशियातील मुख्य जावा बेटावर एक प्रवासी बस खोल अरुंद दरीमध्ये कोसळल्याने 21 जण ठार झाले. या बसमध्ये उत्तर जावा प्रांतातील बोगोर शहरातील एका खासगी कंपनीतील कर्मचारी प्रवास करत होते. हे सर्वजण पश्‍चिम जावामधील सुकाबुमी जिल्ह्यातील पर्यटनस्थळाला भेट द्यायला निघाले होते. या अपघातामध्ये अन्य 9 जणही गंभीर जखमी झाल्याचे हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले.

या मार्गावर अनेक वळणे असलेले घाट आहेत. येथे चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस 30 मीटर खोल दरीमध्ये कोसळली, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. इंडोनेशियामध्ये रस्ते सुरक्षा विषयक उपाय योजना फारच कमी असल्याने अशा प्रकारचे अपघात नित्याची बाब आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)